गडचिरोलीच्या देसाईगंज शहराजवळच्या शेतात वाघाने शेतकऱ्यावर मागून हल्ला केला. पण शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने शेजारच्या शेतातील आणि रस्त्याने जाणारे लोक धावून आले. त्यामुळे वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत.