ताज्या बातम्या

बोंबला...! चक्क पोलीस स्टेशनमध्येच रंगला जुगार ; जिल्हातील राजुरा पोलीस स्टेशन मधील प्रकार

पोलीस स्टेशनमध्ये जुगार खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अनिल ठाकरे, चंद्रपूर

पोलीस स्टेशनमध्ये जुगार खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशन येथील हा प्रकार असल्याची माहिती आहे. व्हिडिओ मध्ये तीन पोलीस शिपाई जुगार खेळताना दिसत आहेत.जुगारांना पकडण्याचं खर तर पोलिसांचे कर्तव्य. मात्र आपले कर्तव्य विसरून पोलिस थेट स्टेशनमध्ये जुगार खेळत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकारावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस ठाण्यामध्येच जुगार खेळण्याचे धाडस करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सहायक पोलीस निरीक्षक दरेकर यांच्या देखील निलंबनाची मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरगे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी यांना निवेदनातून केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया