Ganesh Chaturthi 2025 : दरवर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या 'या' अभिनेत्रीच्या घरी यंदा गणपती नाही?  Ganesh Chaturthi 2025 : दरवर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या 'या' अभिनेत्रीच्या घरी यंदा गणपती नाही?
ताज्या बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : दरवर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या 'या' अभिनेत्रीच्या घरी यंदा गणपती नाही?

गणेशोत्सव 2025: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणपती नाही, कुटुंबातील निधनामुळे धार्मिक कार्यक्रम टाळले.

Published by : Riddhi Vanne

Ganpati Bappa Will Not Be Staying At Actress Shilpa Shetty's House This Year : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करते. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत ती प्रत्येक विधी मनापासून पार पाडते. मात्र, यावर्षी शिल्पा आणि तिचं कुटुंब हा उत्सव साजरा करणार नाही. कुटुंबातील एका सदस्याच्या निधनामुळे त्यांनी 13 दिवसांचा शोक पाळण्याचा निर्णय घेतला असून धार्मिक कार्यक्रम टाळले जात आहेत.

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “प्रिय मित्रांनो, कुटुंबातील एका व्यक्तीच्या निधनामुळे आम्ही यंदा गणेशोत्सव साजरा करू शकत नाही. परंपरेनुसार, आम्ही 13 दिवसांचा शोक पाळणार आहोत आणि कोणत्याही धार्मिक विधीत सहभागी होणार नाही. कृपया आमच्या दुःखात सामील व्हा आणि प्रार्थना करा.” ही पोस्ट तिने कुंद्रा कुटुंबाच्या वतीने शेअर केली आहे.

गणेश चतुर्थी यावर्षी 27 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. या दिवशी देशभरात बाप्पाचे स्वागत करून त्यांची मूर्ती घरात बसवली जाते. दहा दिवस पूजा, अर्चना आणि उत्सवाचे वातावरण असते. अनंत चतुर्दशीला गणपतींचे विसर्जन केले जाते. शिल्पा शेट्टी दरवर्षी आपल्या घरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असली, तरी यावर्षी मात्र तिच्या घरी हा सोहळा होणार नाही.

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा वृंदावनला गेले होते. त्यांनी तेथे अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेतला. यावेळी राज कुंद्रांनी आपली किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र महाराजांनी ती विनम्रतेने नाकारत त्यांना प्रभुचे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, अभिनेता मनीष पॉलने देखील सोशल मीडियावरून माहिती दिली आहे की यंदा तो गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार आहे. त्याच्या आई-वडिलांची प्रकृती नाजूक असल्यामुळे तो नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात उत्सव साजरा करू शकणार नाही. मनीषने चाहत्यांना सांगितले की, पुढील वर्षी मात्र बाप्पाचे स्वागत नेहमीच्या उत्साहात करण्याची त्यांची इच्छा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा