ताज्या बातम्या

Ganpati Special Train : गणपतीक गावाक जाऊचा प्लॅनिंग करतास? जाणून घ्या स्पेशल ट्रेन्सचं शेड्यूल

गणेशोत्सवासाठी कोकणवासीय खूप उत्सुक असतात.

Published by : Siddhi Naringrekar

गणेशोत्सवासाठी कोकणवासीय खूप उत्सुक असतात. अनेकांना घरी जाण्याची ओढ लागलेली असते. सर्वजण गणपतीला गावी जायला आतुर झालेले असतात. यासाठी प्रत्येकजण गावी जाण्यासाठी ट्रेनचं तिकिट बुक करत असतात.

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४० विशेष रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता या वर्षी एकूण २६६ गाड्या धावणार आहेत.पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच स्पेशल ट्रेनसोबत विशेष भाडेही ठेवण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने विशेषतः गणपती उत्सवासाठी ४० विशेष रेल्वे सेवा देण्यात येणार आहे.

१५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी उधना आणि १६ ते ३० सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी मडगावहून सुटणार आहे. ट्रेन क्रमांक ०११८६ स्पेशल १३ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबरपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवारी दुपारी १२ वाजून १० मिनीटांनी कुडाळहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ३५ मिनीटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल.ठाणे, पनवेल, रोहा, मंगोवन, खेड, चिपळून, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्गात थांबणार आहे.

ट्रेन क्रमांक ०११८५ विशेष १३ सप्टेंवर ते २ ऑक्टोबरपर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री १२ वाजून ४५ मिनीटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होऊन त्याच दिवशी सकाळी साडे अकरा वाजता कुडाळ इथे पोहचेल. तसेच वसई-पनवेल-रोहा असा या गाडीचा मार्ग असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे उधना ते मडगाव धावणार आहे. रेल्वेने मुंबई-कुडाळ दरम्यान १८ अतिरीक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा