Gas Team Lokshahi
ताज्या बातम्या

महागाईचा झटका! गॅस सिलेंडर महागले

LPG cylinder price : एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महागाईने सर्वसामान्य माणसाचे हाल होत असताना आज सकाळी आणखी एक झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत (LPG cylinder price hike) वाढ झाली आहे. आता घरगुती एलपीजी (LPG cylinder price news) सिलिंडरच्या किमतीत थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांचे बजेट आता पूर्णतः कोलमडणार आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये आजपासून 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सिलेंडरची किंमत 1 हजार 3 रुपयांवरुन 1052 वर गेली आहे. सध्याच्या दरानुसार दिल्लीत सिलेंडरची किंमत 1053 रुपये झाली आहे. तर, मुंबईत 1052.50 रुपये मोजवे लागणार आहे. कोलकात्यात 1079 ₹ आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये सिलेंडरचा दर झाला आहे.

याआधी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मागील महिन्यात वाढ करण्यात आली होती. तर, मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?