Gautami Patil New Song : गौतमी पाटील आणि निक शिंदेचं सुंदरा गाणं प्रेक्षकांच्या भेटीस  Gautami Patil New Song : गौतमी पाटील आणि निक शिंदेचं सुंदरा गाणं प्रेक्षकांच्या भेटीस
ताज्या बातम्या

Gautami Patil New Song : गौतमी पाटील आणि निक शिंदेचं सुंदरा गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

गौतमी पाटील आणि निक शिंदेचं 'सुंदरा' गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर धुमाकूळ.

Published by : Riddhi Vanne

Gautami Pati and Nick Shinde New Song : तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटीलचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. सुंदरा नावाचं हे गाणं नुकतीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये सोशलमीडियाचा तरुणाईचा आवडता अभिनेता निक शिंदे हा गौतमीसोबत दिसत आहे. संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत तर, विजय बुटे दिग्दर्शित हे गाणं होत. आजपर्यंत रोहित नागभिडे, लालबागची राणी, लूज कंट्रोल, ख्वाडा अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे.

गौतमी पाटीलला सुंदरा गाण्याविषयी विचारले असता, गौतमी म्हणाली की, “कृष्ण मुरारी या गाण्याच्या यशानंतर माझं सुंदरा हे गाणं प्रदर्शित झालं आहे. मी साईरत्न एंटरटेनमेंटचे आभार मानते की त्यांनी मला कृष्ण मुरारी या गाण्यानंतर 'सुंदरा' या गाण्यात पुन्हा संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही 'कृष्ण मुरारी' या गाण्याला भरभरून प्रेम दिल तसच प्रेम सुंदरा या गाण्याला द्या. 'सुंदरा' या गाण्याला सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा.”

गायिका सोनाली सोनवणे गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी विचारले असता ती म्हणाली की, “गाण्याचं नावच सुंदरा आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं किती सुंदर असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला गाताना खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही थिरकणार आहात या गाण्यावर. मी आणि रोहित राऊतने हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं संगीत रोहित नागभिडे यांनी केलं असून वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहील आहे. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा