पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हदरले आहे. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासा होत असताना, आता गौतमी पाटील हगवणेच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसा दिवशी तिचा कार्यक्रम सादर करण्यात केली हो. त्याचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. त्याचपार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत भाष्य केले आहे.
यावेळी गौतमी म्हणाली की, "पुण्यात घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मी पुर्णपणे वैष्णवीच्या घरच्यांसोबत आहे. आम्ही कलाकार असल्याने आमची कला सादर करण्यासाठी हगवणेच्या घरी गेलो होते. त्या कार्यक्रमाचे मला पूर्ण मानधन मिळालं होत.