Gautami Patil Car Accident : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गाडी चालकाच्या रक्ताची तपासणी होणार Gautami Patil Car Accident : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गाडी चालकाच्या रक्ताची तपासणी होणार
ताज्या बातम्या

Gautami Patil Car Accident : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गाडी चालकाच्या रक्ताची तपासणी होणार

कार अपघातामुळे नृत्यांगना गौतमी पाटीलच्या तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती.

Published by : Riddhi Vanne

कार अपघातामुळे नृत्यांगना गौतमी पाटीलच्या तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. रिक्षाचालक यामध्ये गंभीर जखमी झाला. (Gautami Patil) चालकाने या प्रकरणीअमली पदार्थांचे सेवन केलं होतं का, याचा तपास केला जाणार आहे. चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

अपघातानंतर जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी केली आहे. ठाकरे शिवसेनेने गौतमी पाटीलला अटक करण्याच्या मागणीसाठी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं. रिक्षाचालकाच्या मुलीने वडिलांच्या उपचाराचा खर्च आरोपीने करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील आणि अपघातानंतर क्रेन कोणी बोलावली याचाही तपास केला जाणार आहे.

या अपघातानंतर गौतमी पाटील किंवा तिच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच रिक्षाचालकाकडून देखील आरोप करण्यात आला आहे की, पोलीस देखील या प्रकरणी सहकार्य करत नाहीत. दरम्यान ही कार स्वतः गौतमी पाटीलच्या नावावर आहे. त्यामुळे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोशींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गौतमी पाटीलवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रकरण काय?

30 सप्टेंबरला पुण्यातील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव पुलाजवळ एका हॉटेल समोर होती. यामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. त्यावेळी या रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....