PFI Team Lokshahi
ताज्या बातम्या

गझवा ए हिंद, काश्मीर ते पाकिस्तान कनेक्शन; जाणून घ्या काय आहे पाटण्यातील PFI

बिहारच्या राजधानीत सुरू असलेल्या या दहशतवादी खेळाशी संबंधित अनेक मोठ्या गोष्टी समोर येत आहेत.

Published by : Sudhir Kakde

पाटण्यातील फुलवारी शरीफ भागातील पीएफआयचे (PFI) काही सदस्य देशाविरुद्ध मोठा कट रचत असत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिहारच्या (Bihar) राजधानीत सुरू असलेल्या या दहशतवादी खेळाशी संबंधित अनेक मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. आता पोलिसांनी तपशिलात सांगितलं आहे की, पाटण्यात (Patna) सक्रिय असलेल्या या पीएफआयचे गझवा-ए-हिंद आणि काश्मीरशीही संबंध होते. काल रात्री पोलिसांनी दुसरा आरोपी मर्गव अहमद दानिश उर्फ ​​ताहीर याला अटक केली आहे. 2006 ते 2020 पर्यंत त्यांनी दुबईत काम केलं आहे.

पाकिस्तानच्या नंबरवरून तयार करण्यात आला होता व्हॉट्सअॅप ग्रुप

पाटणाचे एसएसपी एमएस ढिल्लन म्हणाले की, आरोपीचा फोन नंबर तपासल्यानंतर तो देशविरोधी कंटेंट पाठवत असल्याचं समोर आलं. तो गझवा-ए-हिंद नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंधित होता. याठिकाणी देशविरोधी गोष्टी घडत होत्या, त्याच विषयांवरची माहिती देखील शेअर केली जात होती. आरोपींच्या फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप ग्रुप होते. पाकिस्तानच्या नंबरवरून हे ग्रुप तयार करण्यात आले होते. यामध्ये आखाती देशांतील अनेक लोकांचाही सहभाग होता. त्याचवेळी बांग्लादेशी व्यक्तीनं जानेवारीमध्ये एक गट तयार केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीला या दोन्ही ग्रुपचा अॅडमिन बनवण्यात आलं होतं.

काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याचा कट

एसएसपी ढिल्लन म्हणाले की, या दोन्ही गटांवर देशविरोधी मजकूर पाठवण्यात आलेले होते. दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या पोस्ट लिहून लोकांना भडकावण्यात आलं होतं. काश्मीरचे तरुण त्यांच्या निशाण्यावर होते. 2023 मध्ये थेट जिहाद करण्याची त्यांची योजना होती. सध्या ते मोठ्या कटाच्या तयारीत व्यस्त होते.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पोलिसांनी फुलवारी शरीफ येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. येथून तरुणांना दहशतवादी बनवण्याचा कट रचल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद नावाचा निवृत्त इन्स्पेक्टर होता. याशिवाय अथर परवेझ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कागदपत्रं आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पोलिसांनी फुलवारी शरीफ येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. येथून तरुणांना दहशतवादी बनवण्याचा कट रचल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद नावाचा निवृत्त इन्स्पेक्टर होता. याशिवाय अथर परवेझ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कागदपत्रं आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका