थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर जगात अजून एका देशात तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. मॅक्सिको सिटीमध्ये पुन्हा एकदा Gen-Z चा संताप दिसून आला. येथे हजारो तरुण देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची सर्रास विक्री आणि त्यातून होणारा हिंसाचार याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती क्लाऊडिया शीनबाम यांची भररस्त्यात एका दारुड्याने छेड काढली होती. त्यामुळे राष्ट्रपतीच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य स्त्रीयांचे काही अवस्था असेल असा प्रश्न विचारल्या जात होता. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणाई उतरली आहे. तर अनेक ज्येष्ठ नागरिकही त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
नेपाळच्या क्रांतीची चर्चा
नेपाळमध्ये जेन झी रस्त्यावर उतरली होती. त्यात संसदेसह अनेक नेत्यांची घरं जाळण्यात आली होती. काही नेत्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. तर पंतप्रधानांसह अनेकांना देशातून पळ काढावा लागला. त्यांच्या घरांना प्रदर्शनकर्त्यांनी, आंदोलनकर्त्यांनी आग लावली. तर मॅक्सिकोत याविषयीची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. राष्ट्रपतींच्या सुरक्षेतील चुकीनंतर तरुणाईचा संताप मोकळा जाला. देशात भ्रष्टाचार, गुन्हेगारांवर वचक नसल्याने सर्वसामान्य त्रस्त झाल्याचा आरोप तरुणाईने केला आहे. यावेळी नॅशनल पॅलेससमोर आंदोलनकर्ते जमा झाले आहेत. त्यांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सध्या तरी तग धरून आहे. पण आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
आंदोलनकर्त्यांची मागणी काय?
आंदोलनकर्त्यांनी अंतर्गत सुरक्षा आणि गुन्हेगारांवर वचक लावण्याचे तसेच सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईची मागणी लावून धरली आहे. 43 वर्षीय डॉक्टर अरिजबेथ गार्सिया यांनी सार्वजनिक सुरक्षेवर भर देण्यासाठी अधिक निधी आणि भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. देशात डॉक्टर सुद्धा सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर मिचोआकानचे मेयर कार्लोस मान्जो यांच्या हत्येने राजकीय पक्ष सुद्धा घाबरलेले आहेत. त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
Michoacan Mayor यांची हत्या
मिचोआकान शहरांचे महापौर कार्लोस मान्जो (Carlos Manzo) यांची 1 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. ते शहरातील अंमली पदार्थांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे नाराज ड्रग्समाफियांनी त्यांची हत्या केली. जनतेसाठी लढणाऱ्या नेत्याची हत्या झाल्याने तरुणाईचा संताप उफाळला. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीची सुरक्षा होत नसेल तर मग पोलिसांचा आणि सुरक्षा यंत्रणांचा काय उपयोग असा सवाल तरुणाई करत आहे. त्यांनी राष्ट्रापती शीनबाम यांच्या सुरक्षा धोरणावर कडाडून टीका केली आहे.