महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी (Nagarpanchyat Election 2026) मतमोजणी होईल. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकालाचे एक-एक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे
1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
7. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
8. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
9. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
10. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
11. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
12. पन्हाळा नगरपरिषद- महेश भाडेकर (अपक्ष)
13. जेजुरी नगरपरिषद - जयदीप बारभाई विजयी (राष्ट्रवादी)
14.मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
15.अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
16. म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
17. फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
18. गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
19. अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
20. कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
21. वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
22. जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
23. पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
24. तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
25. जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
26. उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
27. इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
28. मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
29. मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
30. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
31. सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
32. कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
33. गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
34. भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)