ताज्या बातम्या

Girish Mahajan : राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे आमच्या मतांमध्ये मोठी भर पडणार आहे

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, अतिशय स्वागतार्ह निर्णय माननीय राज ठाकरे यांनी केलेला आहे. त्यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच एक मोठी आमच्या मतांमध्ये भर ही या निर्णयामुळे पडणार आहे. मला वाटते अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कुठलेही आपल्या मतांमध्ये विभाजन होऊ नये. कारण आम्ही समविचारी आहोत.

सुरवातीपासून आपल्याला कल्पना आहे. समविचारी आपण सगळे लोक आहोत. एकाच विचाराने आपण सगळं पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामध्ये विभाजन होऊ नये. मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी विशेष करुन असे म्हटलेलं आहे. मोदीजींवर त्यांचा किती विश्वास आहे त्यांना पुढे करण्यासाठी, त्यांना पंतप्रधान करण्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतो असे त्यांनी वक्तव्य केलं. ते अतिशय स्वागतार्ह आहे. यामुळे आता मतांचे विभाजन होणार नाही. अतिशय अनपेक्षित आकडा महाराष्ट्रातून लोकसभेच्या उमेदवारांचा बघायला मिळेल. असे गिरीश महाजन म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...