ताज्या बातम्या

स्कूटीला धडक देऊन मुलीला सात -आठ किलोमीटर फरफटत नेलं; अपघातात तरूणीचा मृत्यू

दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात कारने धडक देत फरफटत नेल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात कारने धडक देत फरफटत नेल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे ४ वाजता रस्त्यावर नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी कारमधील पाचजणांना अटक केली आहे. तरुणीच्या स्कुटीला धडक दिल्यानंतर तब्बल १२ किमीपर्यंत त्यांनी तिला फरफटत नेलं. यादरम्यान तिच्या शरिरावरील कपडेही फाटले. कारमधील सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते अशी माहिती आहे.

मृत तरूणी ही तिच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिच्या कुटुंबात दोन लहान भाऊ आणि बहिणी आहेत. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई आजारी असते, अशी माहिती मिळाली आहे. दिल्ली पोलिसांना पहाटे माहिती मिळाली की एका वाहनात एक मृतदेह लटकला आहे, हे वाहन कुतुबगढच्या दिशेने जात आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि वाहनाचा शोध सुरू केला. त्यावेली कांजवाला परिसरात एका मुलीचा विवस्त्र मृतदेह रस्त्यावर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेला घटनास्थळी पाचारण करून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी कारचा शोध घेतल्यानंतर ती कार सुलतानपुरी येथे बिघडलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना मृत मुलीची स्कूटीही सापडली आहे. असे दिल्लीचे डीसीपी ओटर यांनी सांगितले.

या घटनेतील आरोपी मुले मद्यधुंद अवस्थेत होती. हे सर्व जण दिल्लीतील मुरथल सोनीपत येथून मंगोलपुरी येथील त्यांच्या घरी परतत होते. यावेळी सुलतानपुरीजवळ त्यांच्या गाडीने मुलीच्या स्कूटीला धडक दिली. त्यामुळे मुलगी गाडीखाली अडकली आणि आरोपी मुलांनी तिला 7 ते 8 किलोमीटरपर्यंत ओढत नेलं.दिल्लीतरी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना समन्स पाठवले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."