sexually abused | Wardha crime  team lokshahi
ताज्या बातम्या

पुलगावात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार

धावत्या कारमध्ये केला बलात्कार आरोपीच्या शोधत पोलीस पथक रवाना

Published by : Shubham Tate

वर्धा (भूपेश बारंगे) : जिल्ह्यात पुलगाव शिवारात धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेत जाताना 13 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवत अपहरण केले. कार मध्ये बसवून धावत्या कार मध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला. पीडित मुलगी शाळेत निघाली असता तिला कार मध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर धावत्या कारमध्येच नराधमांनी तिचे लचके तोडले. या घटनेने मोठी खळबळ उडली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी (Police) दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. (girl was sexually abused in a shocking way in Pulgaon in Wardha)

माहितीनुसार, जिल्ह्यातील पुलगाव येथील, 13 वर्षीय पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता, आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती कारमध्ये खेचलं.

पीडितेचे अपहरण करताच, नराधमांनी सुसाट वेगाने कार पळवली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. दरम्यान, धावत्या कारमध्येच आरोपी सुमेध याने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घारबली. तिने आपल्या आईला घडलेली सर्व घटना सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच, आईने तातडीने पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केलाय. पोलिसांनीही तत्काळ घटनेची दखल घेत आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे. दोन्ही नराधम आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच दोघांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा