Asaram Bapu
Asaram Bapu team lokshahi
ताज्या बातम्या

आसाराम बापूंच्या आश्रमात सापडला मुलीचा मृतदेह, चार दिवसांपासून होती बेपत्ता

Published by : Shweta Chavan-Zagade

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथील आसाराम बापूंच्या (Asaram Bapu) आश्रमात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये हा मृतदेह सापडला. मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

स्वाती पांड्ये असं मृत तरुणीचं नाव आहे. ४ दिवसांपूर्वी स्वाती घरातून बेपत्ता झाली होती. ३ वर्षांपूर्वी माझे पती मनोज पांडे बेपत्ता झाले होते. त्यांचा अजून पत्ता लागलेला नाही. ४ दिवसांपूर्वी माझी मुलगीही बेपत्ता झाली आणि आज तिचा मृतदेहच सापडला. दोन वर्षांपूर्वी स्वातीचा अपघात झाला होता. त्यानंतर तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. ४ दिवसांपूर्वी संध्याकाळी सातच्या सुमारास तिचं अपहरण करण्यात आलं. आम्ही स्वातीला खूप शोधलं मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. आज सकाळीच आश्रमात खूप दिवसांपासून उभी असलेल्या ऑल्टो कारमध्ये तिचा मृतदेह सापडला, अशी माहिती स्वातीची आई गीता पांडे यांनी दिली आहे.

पोलिसांनी कार व आश्रम सील केला

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी कारबरोबरच पूर्ण आश्रमही सील केला, असून घटनेचा पुढील तपास करत आहेत. तरुणीची हत्या करुन मृतदेह गायब करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कारमधून घाण दुर्गंधी येत असताना आश्रमच्या सुरक्षारक्षकाने कार उघडून पाहिली असता कारमध्ये त्याला मृतदेह सापडला. याबाबतची माहिती त्यांने तातडीने पोलिसांना दिली.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल