ताज्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीची मदत द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात पावसानं काल (बुधवारपासून) हाहाकार माजवला आहे. काही भागात नद्या - नाले भरुन वाहू लागले आहेत. नद्यांना पूर आला आहे. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोर धरला. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला.

पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीसंदर्भात माहिती जाणून घेतली. ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर तातडीने मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले...

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणाबाजी; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Ajit Navle : 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशाप्रकारची दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्य गोष्ट आहे

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता