सध्या देशभरात कोरोनाने डोकं वर काढलेलं दिसून येत आहे. 2020 साली कोरोनामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून आला आहे. कोरोनामध्ये अनेकांनी जीव गमावले आहेत. तसेच अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानदेखील झाले आहे. आता पुन्हा एकदा देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण हा आजार आता किती गंभीर आहे? याबद्दल मात्र अनेक मतं असलेली दिसून येत आहेत.
अशातच आता डॉ. रवी गोडसे यांनी कोरोनाबद्दलचे मत व्यक्त केले आहे. रवी गोडसे यांनी व्हीडिओ शेअर करत करत माहिती सांगितली आहे. रवी गोडसे म्हणाले की, "कोरोना परत आला आहे म्हणे. WHO ने त्याचं बारसंदेखील केलं आहे. NB.1.N.1 असं नावदेखील ठेवलं आहे. पण यामध्ये काहीही टेंशन घेण्यासारखे नाही. तो परत आला आहे. म्हणजे तो कुठे बाहेर गेला होता का? फिरायला पाठवलं होतं? विमान पकडून येणार आहे का? सगळ्या जगात तो होताच. पण आता तुम्ही केसेस मोजायला सुरुवात केलीत म्हणून तुम्हाला सापडत आहेत. हा साधा सर्दी खोकला आहे. तपासण्या बंद केल्या तर आपोआप केसेस मिळणं कमी होईल. आत्मा जसा अमर असतो तसा आता कोरोना झाला आहे. आत्मा जसा शरीर बदलतो तसा हा माध्यमं बदलतो".
डॉ. गोडसे पुढे म्हणाले की, "भारतातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. मात्र चीनमधल्या लोकांची रोगप्रतिकरक शक्ती खूप कमी आहे. त्यामुळे तिथे अजूनही या केसेस सापडत आहेत. सगळे जण म्हणत आहेत की हा आजार वाणव्यासारखा पसरत आहे. जर हा आजार पसरला नसता तर लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण झाली असती का? कितीही काळजी घेतली तरीही आपण या आजाराला रोखू शकत नाही. तसेच वॅक्सिनबद्दलही त्यांनी भाष्य करत वॅक्सिनबद्दलही सांगितले आहे.