Air India Team Lokshahi
ताज्या बातम्या

पावसाळ्यात विमान कंपन्यांची ऑफर: 1500 रुपयांत करा प्रवास

ऑफरनुसार देशांतर्गत प्रवास फक्त १५०० रुपयांत करता येणार आहे. परंतु या ऑफरचा लाभ फक्त ७ ते १० जुलै दरम्यान तिकीट बुकींग करणाऱ्या प्रवाश्यांना मिळणार आहे.

Published by : Team Lokshahi

गो फर्स्टने पावसाळा सुरु होताच प्रवाशांसाठी मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार देशांतर्गत प्रवास फक्त १५०० रुपयांत करता येणार आहे. परंतु या ऑफरचा लाभ फक्त ७ ते १० जुलै दरम्यान तिकीट बुकींग करणाऱ्या प्रवाश्यांना मिळणार आहे.

गो फर्स्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यासाठी विविध ऑफर आणल्या आहेत.

१) 1499 रुपयांत देशातंर्गत प्रवास करता येणार आहे. या ऑफर अंतर्गत 26 जुलै 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान प्रवास करण्यासाठी ही ऑफर आहे.

२)मंगळवार आणि बुधवारी प्रवास केल्यास अनलिमिटेड रि-शेड्यूलिंगचा फायदा मिळणार आहे. तसेच फ्रि सीट सिलेक्शनची सुविधा असणार आहे.

३) मुंबईहून गोवा तिकीट फक्त 2019 रुपयांमध्ये मिळणार आहे. लेहसाठी 1894 तर दिल्ली ते श्रीनगर 3641 पासून सुरु होणार आहे.

४)एअर एशियाही मॉन्सून सेल घेऊन येत आहे. या ऑफरनुसार दिल्ली ते जयपूर प्रवास फक्त 1497 रुपयांमध्ये करता येणार आहे. ही ऑफर 7 ते 10 जुलै दरम्यान तिकीट बुकींगसाठी असणार आहे. या ऑफर अंतर्गत 26 जुलै 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान प्रवास करण्यासाठी ही ऑफर आहे.

मर्यादीत जागांसाठी ऑफर

विमान कंपन्यांची ही ऑफर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या प्राधान्य देण्यात येणार आहे. जर या ऑफरसाठी असणारी सीटांचे बुकींग झाले असल्यास सामान्य दरांत तिकीट मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा