ताज्या बातम्या

Godan Express Fire : मुंबईहून निघालेल्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग; प्रवाशांची एकच खळबळ

नाशिकमध्ये गोदान एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग लागली. मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या रेल्वे डब्याला आग लागली असून प्रवाशांची धावपळ झाली.

Published by : shweta walge

नाशिकमध्ये गोदान एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग लागली आहे. मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या रेल्वे डब्याला आग लागली असून प्रवाशांची धावपळ झाली. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली.

नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ आज, शुक्रवारी (ता. २२ मार्च) गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग लागली. ही एक्स्प्रेस मुंबईहून गोरखपूरकडे जात होती. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली. आगीच्या घटनेनंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. आग लागल्याने एक्स्प्रेस थांबवल्याचे समजताच प्रवाशांची एकच खळबळ उडाली.

ही आग पार्सल बोगीला लागली होती. या डब्यात लाखो रुपये किंमतीचा माल होता. तो संपूर्ण जळून खाक झाला आहे. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड