ताज्या बातम्या

GoFirst विमानाचं कोईम्बतूरमध्ये इमर्जन्सी लँडींग; 92 प्रवासी सुखरुप

Published by : Sudhir Kakde

बंगळुरू ते मालदीव गो फर्स्ट फ्लाइटमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कोईम्बतूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे. विमानात 92 प्रवासी होते असं सांगण्यात येतंय. विमानातले सर्व प्रवासी सध्या सुखरूप आहेत. आज संध्याकाळी कोईम्बतूर विमानतळावरून मालदिवच्या दिशेनं जाण्यासाठी या विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बंगळुरूहून उड्डाण घेतल्यानंतर मालेच्या दिशेनं जाणाऱ्या गो फर्स्ट फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. दुपारी १२ वाजता विमानाने उड्डाण घेतल्याची माहिती गोफर्स्टच्या प्रवक्त्यांनी दिली. बरोबर एक तासानंतर इंजिन प्रचंड गरम झालं. त्यानंतर अलर्टचा आलार्म वाजू लागला. पायलटने ताबडतोब हवाई वाहतूक नियंत्रकाशी संपर्क साधला आणि जवळच्या कोइम्बतूर विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली.

इमर्जन्सी लँडिंगपूर्वी रनवेवर अग्निशमन दल तैनात

विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वैमानिकाने कोइम्बतूर विमानतळाच्या धावपट्टीवर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागताच आणि इंजिनबद्दल अपडेट दिले. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा दल घटनास्थळी उपस्थित होते.

सर्व प्रवासी सुरक्षित

GoFirst च्या प्रवक्त्यानं सांगितलं की, फ्लाइटमधील सर्व 92 प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले आहेत. कोईम्बतूरमध्ये इमर्जन्सी लँडिंगनंतर इंजिनीअर्सच्या टीमने फ्लाइटचे इंजिन तपासलं आणि आता फ्लाइट टेक ऑफसाठी पूर्णपणे फिट असल्याचं सांगितलं. संध्याकाळी मालेसाठी विमान रवाना होईल.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी