सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोनं-चांदीचे भाव अखेर काहीसे कमी झाल्याचं दिसून येत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोनं-चांदीच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांची घसरण झाल्याची माहिती आहे. तर चांदीचे दर हे तब्बल 12 हजार 360 रुपयांनी कमी झाले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात सोनं- चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांतील झालेली ही मोठी घसरण आहे. जळगावात गेल्या तीन दिवसांत सोन्याचे दर हे 3 हजार 113 रूपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर हे तब्बल 12 हजार 360 रुपयांनी कमी झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याचे जीएसटीसह दर 94 हजार 863 रुपये तर चांदीचे दर 1 लाख 5 हजार 60 रुपये होते. आजचे सोन्याचे जीएसटीसहचे दर 91 हजार 670 रुपये एक तोळ्यावर आले आहे. तर चांदीचे दर 92 हजार 700 रुपये प्रति किलो इतके आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं-चांदी खरेदी करण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात घसरणीची शक्यता :
आज देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,000 रुपये आहे, तर जागतिक बाजारात त्याची किंमत 3,100 डॉलरपेक्षा जास्त आहे. सुमारे 40 टक्क्यांच्या घसरणीसह येत्या काळात भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते.
किंमती कमी का झाल्या ?
सोन्याचा वाढता पुरवठा- सोन्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत, खाणकामातून होणारा नफा प्रति औंस $950 पर्यंत पोहोचेल. सोन्याचा जागतिक साठाही 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलियाने सोन्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या सोन्याचा पुरवठाही वाढला आहे.