ताज्या बातम्या

Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता, जाणून घ्या आजचे भाव

देशांतर्गत सराफा बाजारात 9 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये स्थिरता पाहायला मिळाली.

Published by : Varsha Bhasmare

देशांतर्गत सराफा बाजारात 9 जानेवाGoldNews आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची हालचाल आणि स्थानिक मागणी यांचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत असून, सध्या सोन्याचे दर उच्च पातळीवर टिकून आहेत. गुंतवणूकदारांसह दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकही दरांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

आजच्या घडीला भारतात 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 13,799 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 12,649 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 10,349 रुपये नोंदवण्यात आला आहे. दागिने खरेदीसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या दरात मोठा बदल दिसून आलेला नाही.

प्रति 10 ग्रॅम दर पाहता, 22 कॅरेट सोनं 1,26,490 रुपयांवर, 24 कॅरेट सोनं 1,37,990 रुपयांवर, तर 18 कॅरेट सोनं 1,03,490 रुपयांवर व्यवहारात आहे. हे दर देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये जवळपास समान पातळीवर असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई, पुणे, केरळ, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,26,490 रुपये असून, 24 कॅरेट सोनं 1,37,990 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 1,03,490 रुपयांवर उपलब्ध आहे. यामुळे या शहरांतील सराफा बाजारात दरांबाबत एकसारखी स्थिती पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राजधानी दिल्ली आणि चंदीगडमध्ये सोन्याचे दर किंचित जास्त आहेत. या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,26,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,38,140 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,03,640 रुपये आहे.

चांदीच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास, आज चांदीचा प्रति ग्रॅम दर 251.90 रुपये असून, प्रति किलोग्रॅम चांदी 2,51,900 रुपयांवर व्यवहारात आहे. सणासुदीचा काळ आणि आगामी लग्नसराई लक्षात घेता, पुढील काळात सराफा बाजारात हालचाल वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा