सोन्याचे भाव तर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. मधल्या काळात सोने थोडे स्वस्त झाले होते.मात्र सराफा बाजारात आज पुन्हा सोन्याच्या भावाने नवी उंची गाठली . त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता गळती लागणार हे निश्चित आहे. सध्या सोन्याच्या भावातील तेजीमुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळाली. आज सराफा बाजारात पुन्हा सोन्याचे भाव वाढलेले आहेत. त्यातच चांदीच्या दरात ही बदल झालेला पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. जसे जागतिक स्तरावरची आर्थिक अस्थिरता, चलनवाढ, आणि गुंतवणूकदारांचा सोन्याकडे असलेला वाढता कल यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे.
जागतिक स्तरावरील अस्थिरता आणि काल पासून चालू झालेला श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने उसळी घेतली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 99,710 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 91,400 रुपये इतकी झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 74,790 रुपये इतकी आहे. मेकिंग चार्जेसनुसार सोन्याच्या किमती थोड्याफार बदलत असतात.
१) दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9986 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9155 रुपये आहे.
२)मुंबई आणि कलकत्त्त्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9971 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 9140 रुपये आहे.
३)चेन्नई आणि हैद्राबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 9971 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 9140 रुपये आहे.
४)केरळ आणि पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9971 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9140 रुपये आहे.
केवळ सोन्याच्या दरातच वाढ झाली नसून चांदीचा सुद्धा भाव वधारला आहे. एका दिवसात चांदीच्या भावात तब्बल ४००० रुपयांनी वाढ झाली असून आज तिची किंमत 1,15,000 रुपये प्रति किलो इतकी आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू या शहरांमध्ये याच दराने चांदीचा भाव आहे. तर चेन्नई, हैदराबाद आणि केरळमध्ये 1,25,000 रुपये प्रति किलो इतकी चांदी आहे.मात्र ग्राहकांनी सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि दागिन्यांवर असलेला हॉलमार्क तपासूनच खरेदी करावी.येणाऱ्या काळात सोन्याचे आणि चांदीचे भाव आणखी वाढत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.