गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर खाली येत आहेत आणि आजची घसरण सर्वाधिक मानली जात आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्यासाठी किती किंमत मोजावी लागणार हे जाणून घेणे आवश्यक आहे. गुरुवार आणि त्यापूर्वी बुधवार या दोन्ही दिवशी सोन्याचे भाव कमी झाले होते. मागील आठवड्यातदेखील शुक्रवार ते मंगळवार सलग तीन दिवस सोन्यात मोठी घसरण झाली होती. ताज्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम किंमतीत तब्बल 1,300 पेक्षा जास्त घट झाली आहे. तसेच 1 किलो चांदी 4,000 पेक्षा अधिक स्वस्त झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार
24 कॅरेट सोन्याचा दर : पूर्वी 1,23,884 → आता 1,22,561 (10 ग्रॅम)
दरातील घट : 1,323 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचा दर : 1,12,266 (1,212 ची घट)
18 कॅरेट सोनं : 91,921 (992 ने कमी)
चांदीचा भाव
पूर्वी 1,58,120 → आता 1,54,113 प्रति किलो
एकूण घसरण : 4,007 प्रति किलो
IBJA त्यांच्या वेबसाईटवर दिवसातून दोन वेळा सोने–चांदीचे दर अपडेट करते, पहाटे एकदा आणि सायंकाळी पुन्हा.
आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण
कॉमेक्सवर सोने : 0.11% घसरून 4,078.20/औंस
चांदी : 0.27% घटून 50.71/औंस
एमसीएक्सचे करार दर (5 डिसेंबर 2025)
सोन्याचा करार : 0.06% वाढ 1,23,130
चांदीचा करार : 0.08% वाढ 1,55,225
लग्नसराई किंवा इतर कारणांसाठी सोने–चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचा काळ लाभदायक ठरू शकतो.