ताज्या बातम्या

Gold Rate : सोन्याचा दर 11 दिवसांत ₹5,366 ने घसरला; चांदीच्या दरातही मोठी घट

सोन्याचा दर 11 दिवसांत ₹5,366 ने घसरला, चांदीच्या दरातही मोठी घट, जाणून घ्या प्रमुख शहरांतील दर.

Published by : Prachi Nate

गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार असणाऱ्या सोने-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून आली आहे. आज (5 मे) रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर ₹220 ने वाढून ₹93734 प्रति 10 ग्रॅम झाला असला, तरी गेल्या 11 दिवसांत सोन्याच्या किंमतीत एकूण ₹5,366 रुपयांची घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 22 एप्रिल रोजी सोन्याचा दर ₹99,100 प्रति 10 ग्रॅम होता.

तर आज तो ₹93,734 पर्यंत खाली आला आहे. चांदीच्या बाबतीतही अशीच परिस्थिती असून, आज ती ₹407 स्वस्त झाली आहे आणि सध्या ₹93,718 प्रति किलो दराने विकली जात आहे. 28 मार्च रोजी चांदीने ₹1,00,934 चा उच्चांक गाठला होता, म्हणजेच तिने एकूण ₹7,216 ची घसरण अनुभवली आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर:

दिल्ली: 22 कॅरेट ₹87,800 | 24 कॅरेट ₹95,880

मुंबई: 22 कॅरेट ₹87,750 | 24 कॅरेट ₹95,730

कोलकाता: 22 कॅरेट ₹87,750 | 24 कॅरेट ₹95,730

चेन्नई: 22 कॅरेट ₹87,750 | 24 कॅरेट ₹95,730

भोपाळ: 22 कॅरेट ₹87,800 | 24 कॅरेट ₹95,780

सोने खरेदी करताना BIS हॉलमार्क आणि HUID नंबर असलेलेच सोने निवडावे. हे प्रमाणित अल्फान्यूमेरिक कोड (उदा. AZ4524) सोने किती शुद्ध आहे याची खात्री देतात. खरेदीपूर्वी सोन्याचा वजन आणि दर अधिकृत स्त्रोतांकडून, जसे IBJA च्या संकेतस्थळावरून, तपासावा. दर 24, 22 आणि 18 कॅरेटनुसार बदलतात. सोने खरेदी करताना UPI, कार्ड्स किंवा डिजिटल पेमेंटचा वापर करावा आणि बिले घ्यावी. ऑनलाइन खरेदी करताना पॅकेजिंग योग्य प्रकारे तपासणे देखील आवश्यक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा