देशाचं आर्थिक बजेट 1 फेब्रुवारीला संसदेत जाहीर होणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आगामी बजेटच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. याशिवाय, सरकार बजेटमध्ये सोन्याच्या आयातीवर लागू असलेल्या ड्यूटीत वाढ करू शकते, ज्यामुळे सोन्याच्या दरात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरकारने सोन्याच्या इम्पोर्ट ड्यूटीत घट केली होती.
31 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे तसेच चांदीचे भाव काही दिवस वगळता एकूणच वाढले आहेत. आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर 83,000 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 76,000 रुपयांच्या आसपास आहे. चांदीच्या दरातही आज 2000 रुपयांची वाढ झाली असून, एक किलो चांदीचा दर 98,600 रुपये झाला आहे.