थोडक्यात
सोन्याचा भाव जाणार तब्बल इतक्या लाखांवर
वर्षभरात 35 वेळा वाढला सोन्याचा भाव
सोनं 1.35 लाख रुपयांवर जाणार, पण अट काय?
गेल्या काही दिवसांपासून सोने तसेच चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत वाढ होत आहे. जागतिक मध्यवर्ती बँका, सोन्याची होत असलेली खरेदी, भू-राजकीय तणाव तसेच आशियातील सोन्याची वाढत मागणी यामुळे सोन्यााच भावात वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आगामी काळात सोन्याचा भाव तब्बल 4500 डॉलर्स प्रतिऔंस रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शियल लिमिटेडच्या (MOFSL) रिपोर्टनुसार सोने आणि चांदीने या वर्षात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे औद्योगिक गरज आणि वाढती मागणी यामुळे भविष्यात चांदीचा दरदेखील 75 डॉलर्स प्रतीऔंसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
वर्षभरात 35 वेळा वाढला सोन्याचा भाव
मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2025मध्ये सोन्याचा भाव तब्बल 50 टक्क्यांपेक्षा अधिक किमतीने वाढलेला आहे. सध्या सोन्याचा भाव हा 4000 डॉलर्स प्रतिऔंसच्या पुढे गेला आहे. सोन्याने आतापर्यंत 35 वेळा ऐतिहासिक तेजी गाठलेली आहे. वैश्विक अनिश्चितता, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून केली जाणारी संभाव्या व्याजदर कापत यामुळे सोन्याच्या भावात ही वाढ झालेली आहे.
सोनं 1.35 लाख रुपयांवर जाणार, पण अट काय?
MOFSL चे अधिकारी मानव मोदी यांनी सोन्याच्या वाढत्या भावाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मतानुसार कमजोर झालेला डॉलर, केंद्रीय बँकांकडून रणनीतीत केले जात असलेले बदल यांच्यामुळे सोन्याचा हा भाव दिसत आहे. MOFSL च्या रिपोर्टनुसार भारतात सोन्याचा भाव सध्या 1.20 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. आगामी काळात हा भाव 1.35 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर चांदीची किंमतही वर्षभरात आतापर्यंत 60 टक्क्यांनी वाढली असून हा भाव 2.3 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचण्याची शक्यता आहे. डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर 89 राहिल्यानंतर सोन्याची ही भाववाढ शक्य असल्याचे MOFSL च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.