सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ होऊन सोने आता 88 हजार 400 इतके प्रतितोळा पोहचली असून चांदी 1 लाख 700 इतकी प्रतिकिलो झाली आहे. सोने आणि चांदी 5 महिन्यांपासून नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यानंतर अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून नवीन निर्णय घेण्यात येत असल्यामुळे सोने आणि चांदी अधिक भावाने वाढू लागले.
12 मार्चला सोने 86 हजार 600 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचल्यानंतर 13 तारखेला त्यात 700 रुपयांची वाढ झाली, आणि आता ते 87 हजार 300 रुपये झाले. शनिवारी त्यात 1 हजार 100 रुपयांची वाढ झाली. त्याचसोबत 12 मार्चला चांदीच्या भावात 1 हजार रुपयांनी वाढ होऊन ती आता 99 हजारांवर जाऊन पोहोचली.
तर 13 व 14 रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर पुन्हा शनिवारी चांदीत 1 हजार 700 इतकी वाढ झाली. दरम्यान ती वाढ थेट 1 लाख 700 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. दोन्ही ही धातूंचे हे आतापर्यंतचे उच्चांकी भात आहेत.