ताज्या बातम्या

Gold-Silver Price : सोन्याच्या किमंतीत झपाट्याने वाढ; वर्षाअखेरीस 1.10 लाखांचा जाण्याचा अंदाज

सोन्याच्या किमतीत वाढ: 24 कॅरेट सोनं ₹97,493 वर, वर्षाअखेरीस ₹1.10 लाखांचा अंदाज.

Published by : Team Lokshahi

आज, 7 मे 2025 रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत तब्बल ₹605 ने वाढू ₹ 97,49 वर पोहोचली आहे. याआधी ती किंमत ₹96,888होती. त्याचप्रमाणे, चांदीही मागे राहिलेली नाही. एक किलो चांदी ₹279 ने वाढून ₹ 96,133 रुपये प्रतिकिलो झाली आहे. आधी तिची किंमत ₹ 95,854 होती. याआधी 28 मार्च रोजी चांदीने ₹1,00,934 चा उच्चांक गाठला होता, तर एप्रिल रोजी सोन्याचा उच्चांक ₹ 99,100 रुपये होता

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याच्या किमती (१० ग्रॅम)

देशातील प्रमुख महानगरांमध्ये सोन्याच्या दरात लक्षणीय फरक आहे.

दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत ₹90,900 आणि 24 कॅरेटसाठी ₹99,150 आहे.

मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये 22 कॅरेटसाठी ₹90,750 आणि 24 कॅरेटसाठी ₹99,000 रुपये दर आहे.

भोपाळमध्ये कॅरेट सोन्याचा दर ₹90,800 आणि 22 कॅरेटचा ₹99,050 आहे.

वर्षभरात सोन्या-चांदीत झपाट्याने वाढ

साल २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ₹21,321 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹76,123 होता, जो आता ₹९७,४९३ वर गेला आहे. चांदीसुद्धा 10,116 रुपयांनी वाढली आहे, ₹86,017 वरून थेट ₹96,133 पर्यंत आहे.

वर्षअखेर सोन्याचा भाव ₹1.10 लाखांवर जाण्याचा अंदाज

गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेनुसार, अमेरिका-चीनमधील व्यापार तणाव आणि जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सोने $३,७०० प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे भारतात १० ग्रॅम सोन्याचा भाव वर्षाअखेरीस ₹१.१० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सोनं खरेदी करताना “हॉलमार्क” तपासा

ग्राहकांनी नेहमीच BIS प्रमाणित हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी करावे. सोन्यावर 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असतो. उदा. AZ4524. हाच नंबर सोने किती कॅरेटचा आहे हे स्पष्ट करतो आणि खरेदीसाठी सुरक्षितता वाढवतो. सोन्या-चांदीच्या दरांमध्ये होत असलेली सतत वाढ ही गुंतवणूकदारांसाठी एक संकेत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. मात्र, खरेदीपूर्वी हॉलमार्क तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा