आनंदवार्ता! केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच सोन्या–चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज, १ फेब्रुवारी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचा अर्थसंकल्प 2026 सादर करणार आहेत. त्या सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडत असून, या बजेटचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत या दरांनी अचानक उतार घेतला आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ९ हजार रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरात ४४ हजार रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.
आजचे (१ फेब्रुवारी) सोन्या–चांदीचे दर
आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 16,058 रुपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 14,720 रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 12,044 रुपये आहे. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर 1,47,200 रुपये, २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर 1,60,580 रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर 1,20,440 रुपये इतका आहे.
चांदीच्या किमतींबाबत बोलायचं झाल्यास, आज चांदीचा प्रति ग्रॅम दर 350 रुपये, तर प्रति किलो दर 3,50,000 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.
कालचे (३१ जानेवारी) दर किती होते?
काल, ३१ जानेवारी रोजी, २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 16,919 रुपये, २२ कॅरेटचा 15,509 रुपये, तर १८ कॅरेटचा 12,689 रुपये होता. प्रति १० ग्रॅम दर पाहता, २२ कॅरेट सोनं 1,55,090 रुपये, २४ कॅरेट सोनं 1,69,190 रुपये, तर १८ कॅरेट सोनं 1,26,890 रुपये या पातळीवर होतं. चांदीचा भाव काल प्रति ग्रॅम 394.90 रुपये, तर प्रति किलो 3,94,900 रुपये होता. अवघ्या एका दिवसात झालेली ही घसरण लक्षवेधी ठरत आहे.
प्रमुख शहरांतील आजचे दर
आज मुंबई आणि पुणे येथे २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम 1,47,200 रुपये, २४ कॅरेट 1,60,580 रुपये, तर १८ कॅरेट 1,20,440 रुपये आहे. केरळ आणि कोलकाता येथेही हेच दर कायम आहेत. दिल्ली आणि लखनौ या शहरांमध्ये मात्र किंचित फरक दिसून येतो. येथे २२ कॅरेट सोन्याचा दर 1,47,350 रुपये, २४ कॅरेट 1,60,730 रुपये, तर १८ कॅरेट 1,20,590 रुपये इतका आहे.
दर घसरण्याचं कारण काय?
अर्थसंकल्पात आयात शुल्क, जीएसटी किंवा आर्थिक धोरणांबाबत काही दिलासादायक घोषणा होण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याचं बाजारतज्ज्ञ सांगतात. याशिवाय जागतिक बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या चढ-उतारांचाही परिणाम सोन्या–चांदीच्या दरांवर होत आहे.