ताज्या बातम्या

Cidco Lottery 2024: आनंदाची बातमी! सिडकोकडून नवी मुंबईतील 902 घरांसाठी लॉटरी

दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोने 902 घरांची योजना जाहीर केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोने 902 घरांची योजना जाहीर केली आहे. या घरांच्या ऑनलाइन नोंदणीला आज, मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. तर 10 ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.

एकूण 902 सदनिकांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील 213 आणि सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती ब वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील 689 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात.

ऑनलाईन अर्ज नोंदणी : 27 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजता नोंदणी सुरु ते 25 सप्टेंबरपर्यंत

सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 27 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजता नोंदणी सुरु ते 26 सप्टेंबरपर्यंत

ऑनलाईन शुल्क भरणा : 27 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर

संगणकीय सोडत : 10 ऑक्टोबर

सिडकोच्या वेबसाईटवर या 902 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी सिडकोच्या वेबसाईटवर 27 ऑगस्ट म्हणजेच आज दुपारपासून सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा