ताज्या बातम्या

Google Account Help : तुमचे Contact नंबर्स डिलिट झालेत का?; मिळवता येतील, करा 'ही' छोटीशी गोष्ट

डिलिट कॉन्टॅक्ट्स पुनर्प्राप्ती: Truecaller आणि Super Backup अ‍ॅप्सचा वापर करून नंबर परत मिळवा.

Published by : Team Lokshahi

अनेकदा फोन बदलताना किंवा चुकून डेटा डिलिट करताना आपले महत्त्वाचे मोबाइल नंबरही गायब होतात. अशा वेळी अनेकजण सायबर कॅफे, टेक्निशियन यांच्याकडे धाव घेतात. पण खरंतर, काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही घरी बसूनच तुमचे डिलिट झालेले कॉन्टॅक्ट्स पुन्हा मिळवू शकता तेही अगदी मोफत.

Android युजर्सनी सर्वप्रथम हे तपासायला हवे की त्यांचे कॉन्टॅक्ट्स Google अकाउंटसोबत लिंक होते का?. जर होय, तर पुढील स्टेप्स फॉलो करा:

1. मोबाईलच्या Settings मध्ये जाऊन Google सेक्शनमध्ये प्रवेश करा.

2. Manage your Google Account वर क्लिक करा.

3. People & Sharing > Contacts या पर्यायांमध्ये जा.

4. आता contacts.google.com या वेबसाइटवर ब्राउजरमधून लॉगिन करा.

5. तिथे सर्व जुने कॉन्टॅक्ट्स दिसतील.

6. डिलिट झालेले नंबर परत मिळवण्यासाठी Undo Changes ऑप्शनवर क्लिक करा आणि हवे असल्यास 10, 30 दिवस किंवा कस्टम डेट निवडा.

iPhone युजर्ससाठी प्रक्रिया:

iPhone वापरकर्त्यांसाठीही कॉन्टॅक्ट्स परत मिळवणे सोपे आहे, जर iCloud सिंकिंग चालू असेल:

1. Settings > Apple ID > iCloud मध्ये जा.

2. Contacts चा स्विच ऑन करा.

3. नंबर लगेच दिसायला लागतील.

4. अन्य पर्याय म्हणून iCloud.com वर लॉगिन करून Account Settings > Advanced > Restore Contacts वापरा.

थर्ड पार्टी अ‍ॅप्स आणि एसएमएसचा उपयोग:

Truecaller, Super Backup यांसारख्या अ‍ॅप्समध्येही तुमचे जुने नंबर सेव असू शकतात. तसेच, मोबाईलच्या SMS अ‍ॅपमध्ये जुन्या संभाषणांतून नंबर पुन्हा सेव करता येतात. थोडी काळजी आणि योग्य पद्धत वापरल्यास, डिलिट झालेले नंबर सहज परत मिळवता येतात. त्यामुळे घाबरू नका – तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळं शक्य आहे!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा