लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. तर गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडे, उन्मेश पाटील, मनोज कोटक यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. भाजपकडून गोपाळ शेट्टींना उमेदवारी दिली गेली नाही आहे.
याच पार्श्वभूमीवर आता गोपाळ शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपाळ शेट्टी म्हणाले की, पक्षानं खूप काही दिलं आहे. काम करत राहायचं. लोकांना जेवढे मतदान केलं तेवढे मी त्यांना परत देऊ शकलो नाही म्हणून मी काम करणार. मी कालच म्हटले मी मोकळा झालो आहे. लोकशाही आहे. प्रत्येकाला स्वत:चा विचार आहे. पक्षानं दिलेल्या उमेदवार निवडून आणायचा. मी जनतेसाठी कायम काम करत राहणार. कार्यकर्ते कोणाचं नसतात. दुसऱ्या पक्षात जाण्याचं स्वप्नातही पाहणार नाही.
अनेक लोकांचे तिकीट कापलं जातात. ज्यावेळी पक्षानं 1992 ला पहिल्यांदा तिकीट दिलं तेव्हा कोणीही विचारलं नाही तुम्हाला का तिकीट दिलं. ज्यांनी तिकीट कापलं त्यांना मी विनंती करेन की त्यांनी ते जाहीर करावं म्हणजे लोकांना कळेल. निवडणुकीच्यादिवशी मतदान ज्यावेळी संपेल त्या क्षणापर्यंत गोपाळ शेट्टी पियुष गोयल यांच्यासाठी काम करणार. त्यानंतर पक्ष आणि लोकांसाठी काम करणार. असं गोपाळ शेट्टी म्हणाले.