ताज्या बातम्या

Gopichand Padalkar : सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर एकेरी टीका

गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी पवारांनी मस्ती केली.

Published by : Siddhi Naringrekar

वसिम अत्तर, सोलापूर

Gopichand Padalkar on sharad pawar : गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी पवारांनी मस्ती केली. यावर्षी पवार का नाही आला. पवार चार वेळा मुख्यमंत्री होता. बारा वर्षे केंद्रात मंत्री होता. तो पण आता होता मागं कधी होता मला माहिती नाही. गेल्या वर्षी त्यांना आपली चोंडी काढून घ्यायची होती त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चोंडी जागृत ठेवली पाहिजे असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना केले आहे. सोलापुरातील मंद्रूप येथील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते

जेजुरी देवस्थान मध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थान आणि पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान हे होळकरांची जागीरदारी आहे. जेजुरी संस्थान येथील अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार अशी पत्रिका आली. त्याच्या वेळी मला कळले होते. काहीतरी मोठी गेम चालू आहे. मात्र पहाटे तरुणांना सांगून पुतळ्याचे मी उद्घाटन केले. सांगलीतही तेच केले? गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या सडकून टीका केली.. रोहित पवार हे जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. रोहित पवार यांचा उल्लेख माकडा असा करत धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात तुला माहिती नाही का, तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा खडा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे