Government Medical College, Sindhudurg
Government Medical College, Sindhudurg  Team Lokshahi
ताज्या बातम्या

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर विद्यार्थ्यांच्या फी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

Published by : Sagar Pradhan

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या फि अपहार झाल्या प्रकरनी तत्कालीन वरिष्ठ लिपिका विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा 25 जानेवारी रोजी दाखल होउन सुद्धा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता गुन्हा नोंद नसल्याची माहिती देण्यात आली. यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे... याबाबत मनसेचे प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करत पोलीस ठाण्याची F.I.R प्रसिद्ध केली आहे

या अपहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग आयुक्तांकडे तक्रार केली होती. यामध्ये मेडिकल कॉलेज मधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भरणा केलेले विद्यापीठ शुल्क व अनामत रक्कम शासन खात्यावर न करता वैयक्तिक खात्यावर स्वीकारली होती आणि यामुळे विद्यापीठाचे शुल्क निर्धारित वेळेत जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती. यासंदर्भात पुराव्यानिशी दाखल तक्रारीवर वरिष्ठ स्तरावरून प्राथमिक चौकशीची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या फ्रीमध्ये घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर आयुक्तांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम फुसांडे यांच्यावर 4 लाख 32 हजार 250 रुपये रकमेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत माहिती न दिल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मनसेचे प्रसाद गावडे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना