Transfers Of Governors 
ताज्या बातम्या

Transfers Of Governors : 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले, वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांनी महाराष्ट्राचे (Maharashtra)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि लडाखचे (Ladakh)उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर (Radha Krishnan Mathur)या दोघांचे राजीनामे (Resignation)मंजूर केले आहेत. राष्ट्रपतींनी एकूण 13 राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais)यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केलीय. त्याचबरोबर गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) यांच्याकडं आसाम तर माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला (Shivpratap Shukla)यांना हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आलीय.

जाणून घ्या, नवनियुक्त राज्यपाल आणि उपराज्यपालांची संपूर्ण यादी

1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश

2. लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम

3. सी. पी. राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड

4. शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश

5. गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम

6. निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश

7. बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ

8. अनुसुईया उईके, राज्यपाल, मणीपूर

9. एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड

10. फागू चौहान, राज्यपाल, मेघालय

11. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार

12. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

13. निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, उपराज्यपाल, लडाख.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा