ताज्या बातम्या

ट्रक चालकांसाठी सरकार कायदा आणणार; नितीन गडकरी

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दिल्लीतील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना लवकरच ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. तसेच, 2025 च्या अखेरपर्यंत रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असे गडकरींनी सांगतिले.

यासोबतच "ट्रक चालकांसाठी कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. या वर्षी मंत्रालयाने 'सर्वांसाठी सुरक्षित रस्ते' या उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छता पंधरवड्यातंर्गत 11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला. रस्ते अपघात 2025 च्या अखेरपर्यंत 50 टक्क्यांनी कमी करण्याचं मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे.

तसेच "रस्ते मंत्रालय, रस्ते अपघात कमी करण्यासाठी मंत्रालय कटिबद्ध आहे आणि रस्ते सुरक्षेत कोणतेही 4ई - अभियांत्रिकी, अंमलबजावणी, शिक्षण आणि आपत्कालीन काळजी या क्षेत्रात अनेक पावलं उचलली गेली आहेत." असे गडकरी म्हणाले.

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया

Harbour Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा; मुरलीधर मोहोळ म्हणाले...