aurangabad gang rape team lokshahi
ताज्या बातम्या

नात्याला काळिमा: वासनांध आजोबाचा चिमुरड्या नातीवर लेंगिक अत्याचार

लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे उजेडात येत असून त्यांना न्यायालयाकडून शिक्षा ही सुनावल्या जातं आहे. तरीही असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.स्वतःच्या मुलीच्या मुलीवरआजोबाने अत्याचार केल्याची घटना वर्धेच्या रामनगर परिसरात उघडकीस आलीय.

Published by : Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा

लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे उजेडात येत असून त्यांना न्यायालयाकडून शिक्षा ही सुनावल्या जातं आहे. तरीही असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.स्वतःच्या मुलीच्या मुलीवरआजोबाने अत्याचार केल्याची घटना वर्धेच्या रामनगर परिसरात उघडकीस आलीय. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी रात्री घडली.याप्रकरणात एका 70 वर्षीय नराधम आजोबाने अवघ्या 7 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार केलाय. रामनगर पोलिसांनी याप्रकारणी नराधम आजोबाला अटक केली आहे.

महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे महिला आणि तिची सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत घर असलेल्या तिच्या आई-वडिलांकडे दीड वर्षांपासून राहत आहे. रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नराधम 70 वर्षीय आजोबा त्याच्या खोलीत चिमुरडीशी अनैसर्गिक कृत्य करताना दिसला. महिलेने ची मुलगी लागेल थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वासनांध आजोबास अटक केली.

वासनांध आजोबा त्याच्या खोलीत नातीसोबत दुष्कृत्य करताना दिसला. हे पाहून आजीने जोरजोरात आरडाओरडा केला. आजी ओरडल्याचे पाहून चिमुरडीच्या आईनेही खोलीकडे धाव घेतली आणि हे बिंग फुटले. चिमुरडीने घडलेला सर्व प्रकारच्या आईला सांगितला आणि थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा