Crime Branch Police team lokshahi
ताज्या बातम्या

कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांची मोठी कामगिरी, 13 गुन्हे उघडकीस

देशभरात मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा कल्याणमध्ये गजाआड

Published by : Shubham Tate

कल्याण (अमजद खान) - मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोरटय़ास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. शहजाद सय्यद असे या चोरटय़ाचे नाव असून तो अजमेरचा रहिवासी आहे. मात्र देशभरात रेल्वे गाडय़ातून चोरी करतो. फक्त कल्याणमध्ये त्याने 13 चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. (Great achievement of Kalyan Railway Crime Branch Police, 13 crimes were solved)

काही दिवसापासून कल्याणहून कसारा आणि कजर्तच्या दिशेने जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विशेष म्हणजे मेल एक्सप्रेसगाडय़ात महिलांचे पर्स चोरीच्या घटना घडत होत्या. महिला प्रवाशांच्या पर्समध्ये हात टाकून चोरटा मोठय़ा शिताफीने महागडय़ा वस्तू आणि पैसे लंपास करत होता. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या मार्गदर्शनाखाली पा कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्शद शेख, पोलिस अधिकारी प्रकाश चौगुले, शंकर परदेशी पोलिस हवालदार रंजीत रासकर, वैभव जाधव, अजित माने, अक्षय चव्हाण यांच्या पथक या चोरट्याच्या शोधात होते.

कल्याण रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक संशयीत पोलिसांच्या नजरेत आला. काही दिवसापूर्वी हा संशयीत तिकडे फिरत असताना पोलिसांनी पाहिले होते. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सांगितले. शहजाद सय्यद असे त्याचे नाव असून तोच या चोरी करत होता. शहजाद हा मूळचा अजमेर येथे राहणारा असून सध्या तो कल्याणच्या पत्रीपूल परिसरात भाडय़ाने खोली घेऊन राहत होता. 2017 मध्ये अहमदाबाद पोलिसांनी शहजादला रेल्वेतील चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. हा देशभरात फिरून मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करुन महिलांच्या पर्सवर डल्ला मारतो. ही शहजादची चोरीची पद्धत आहे. कल्याणमध्ये त्याने 13 चोऱ्या केल्या असल्याचे उघड झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस