Green Curry Leaves 
ताज्या बातम्या

Green Curry Leaves : वजन कमी करायचे आहे.. जाणून घ्या 'हा' भन्नाट उपाय

आजकाल वाढते वजन ही अनेकांची मोठी डोकेदुखी बनली आहे. वजन वाढले की त्यासोबत साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांचा धोका वाढतो.

Published by : Riddhi Vanne

आजकाल वाढते वजन ही अनेकांची मोठी डोकेदुखी बनली आहे. वजन वाढले की त्यासोबत साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांचा धोका वाढतो. विशेषतः पोट आणि मांड्यांवर साठलेली चरबी कमी करणे कठीण जाते. महागडे डाएट, जिम आणि सप्लिमेंट्स वापरूनही फारसा फरक पडत नाही, उलट आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशावेळी स्वयंपाकघरातील कढीपत्ता हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.

कढीपत्ता का आहे फायदेशीर?

शरीराची पचनशक्ती वाढवतो. चयापचय क्रिया सुधारतो. पोटावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवतो. नैसर्गिक पद्धतीने शरीर स्वच्छ (डिटॉक्स) करतो.

वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता कसा वापरावा?

सकाळी उठल्यावर उपाशीपोटी २–३ ताजी पाने चावून खावीत. रोज घेतल्यास काही आठवड्यांत फरक जाणवतो.

कढीपत्त्याचा चहा कसा बनवायचा?

एका भांड्यात पाणी उकळवा. त्यात १०–१५ कढीपत्त्याची पाने टाका. पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्या. गाळून थोडे थंड झाल्यावर लिंबाचा रस मिसळा. सकाळी चहाऐवजी हे पाणी प्या

काय फायदा होतो?

कॅलरी कमी होण्यास मदत. शरीरातील घाण बाहेर टाकली जाते. वजन घटण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या वेग घेते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा