ताज्या बातम्या

शिंदे - फडणवीसांकडून मेट्रो 3 ला हिरवा झेंडा

वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची आज ट्रायल पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ चा शुभारंभ झाला. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी झाली.

Published by : Siddhi Naringrekar

वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची आज ट्रायल पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ चा शुभारंभ झाला. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सारिपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला.

आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना दुसरीकडे मात्र ट्रायल झाली आहे. या मेट्रोसाठी दोन रॅक मुंबईत दाखल झाले आहेत. मेट्रो प्रकल्प सेवेत दाखल करण्यासाठी चाचणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच मेट्रो मार्गिकेला आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार आहे. आरे कारशेडच्या कामालाही सुरुवात करण्यात आली असून कारशेडचे काम जून २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूणच डिसेंबर २०२३ मध्ये पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने एमएमआरसीने मंगळवारी मेट्रो ३ ची चाचणी केली.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के झाले आहे. मात्र, कारशेडबाबत निर्णय झालेला नसल्याने मेट्रो-3 चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो - 3 ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची भीती आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम २०१६ पासून हाती घेण्यात आले आहे. ही मार्गिका २०२१ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, कारशेडचा वाद आदी कारणांमुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड