ताज्या बातम्या

GST Collection : जीएसटी संकलनात सरकारचा विक्रमी उच्चांक ; पाच वर्षांत दुप्पट वाढ

करदात्यांची संख्या दुप्पट; जीएसटी संकलनात ऐतिहासिक वाढ

Published by : Team Lokshahi

जीएसटी संकलनात सरकारने स्वतःचाच रेकॉर्ड तोडत विक्रमी संग्रह नोंदवला आहे. एकूण जीएसटी संग्रह पाच वर्षांत दुप्पट झाला असून जीएसटी संकलनात झालेली वाढ ही सरकारने ठरवलेल्या कायदे आणि प्रणालींचे पालन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे करदात्यांची संख्या दुप्पट झाल्यामुळे झाले आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक मजबूत बळकटी आलेली आहे.

गेल्या चार वर्षाआधी 2020-21 मध्ये 11.37 लाख कोटी रुपये इतका जीएसटी सरकारी खात्यात जमा झाला होता. मात्र आता या वित्तीय वर्षांमध्ये 2024-25 मध्ये तब्बल 22.08 लाख कोटी रुपये सरकारी खात्यात जमा झाले आहे. यामुळेच यावेळचे जीएसटी संकलन वेगळ्या उच्चांकापर्यंत पोहोचले आहे. विशेष बाब म्हणजे हा जीएसटी गेल्या पाच वर्षात दुप्पट झाला आहे.

जेव्हापासून जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली तेव्हापासून सरकारच्या तिजोरीमध्ये वाढच होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुद्धा जीएसटीचे संकलन जास्तच झाले आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आधीपेक्षा करदात्यांची संख्या दुप्पट झाली आहे.जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या 2017 मध्ये 65 लाख इतकी होती आता आठ वर्षांत ती संख्या १.११ कोटी रुपयांवर गेली आहे. आता सरकारने जीएसटी संकलनासह एक नवा विक्रमही नोंदविला आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही वर्षांत जीएसटी संकलनात अधिक वाढ दिसून येणार आहे.

जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासून जीएसटीने महसूल संकलन आणि कर बेसमध्ये जोरदार वाढ दर्शविली आहे. यामुळे भारताची आर्थिक बाजू मजबूत झाली असून अप्रत्यक्ष कर अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा