गुजरातच्या मेहसाणा येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न दु:स्वप्नात बदललं आहे. पत्नी आणि दोन मुलांसह बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र योजना यशस्वी न झाल्यानं त्यांना दीड कोटी रुपये मोजावे लागले आहेत. त्यानंतर त्यांना आतापर्यंत फक्त एक कोटी रुपयांची व्यवस्था करता आली आहे. मानवी तस्करांनी त्याची पत्नी आणि 12, 7 आणि 5 वर्षे वयोगटातील तीन मुलांना अमेरिकेच्या आधी मेक्सिकोमध्ये ओलीस ठेवलं. त्यानंतर त्याला ब्रेन स्ट्रोक आला आणि आता तो मेक्सिकोतील कॅनकन सिटी येथील रुग्णालयात तो जीवन आणि मृत्यूशी झुंज देतोय.
34 वर्षीय प्रियांक पटेल, त्यांची पत्नी उमा आणि तीन मुलांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सालदी गाव सोडलं. त्यांच्यासोबत डिंगुचा येथील चार जणांचं कुटुंबही होतं. परंतु सीमा ओलांडून अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात त्या कुटुंबाचा मृत्यू झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरात पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, प्रियांक आणि त्याचं कुटुंब दोन एजंटच्या मदतीनं दिल्लीत आलं आणि तिथून मेक्सिकोला गेले. दीड कोटी रुपयांत हा करार झाला असून, पहिला हप्ता दोन्ही एजंटांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.