ताज्या बातम्या

Gujrat Riots Case: सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना गुजरात पोलिसांकडून अटक

गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटकसत्र सुरु आहे. यातच आता अहमदाबाद पोलिसांनी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करुन तीन लोकांना अटक केली आहे. मागील बऱ्याच काळापासून पालनपूर तुरुंगामध्ये अटकेत असणाऱ्या भट्ट यांना अहमदाबाद पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतलं.

Published by : Siddhi Naringrekar

गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद ( Gujarat Police SIT arrested former IPS officer Sanjiv Bhatt ) पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटकसत्र सुरु आहे. यातच आता अहमदाबाद पोलिसांनी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करुन तीन लोकांना अटक केली आहे. मागील बऱ्याच काळापासून पालनपूर तुरुंगामध्ये अटकेत असणाऱ्या भट्ट यांना अहमदाबाद पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतलं.

त्यांच्याबरोबरच बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट (हे २० जून २०१९ पासून तुरुंगात आहेत) आणि तिस्ता सेटलवाड अशा तिघांवर कलम ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटेपणा करणे), कलम ४७१ (जाणीवपूर्वक खोटी कागदपत्रे ), कलम १९४ (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच त्यांच्यावर कलम २११ (दुखापत करण्याच्या उद्देशाने गुन्ह्याचा खोटा आरोप करणे), कलम २१८ (सरकारी अधिकाऱ्याने चुकीच्या नोंदी करणे), आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गोधरा जळितकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये (Gujrat) दंगल उसळली होती. त्यात अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंतप्रधान मोदी तसेच आणखी ६३ जणांना एसआयटीने (विशेष तपास पथक) निर्दोषत्व किंवा क्लीन चिट दिली होती. २००२मधील गुजरात दंगल हे मोठे षड्यंत्र असून त्यासंदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी याचिका अहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत तिस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्त्या आहेत. झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली असून एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा