केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगभरातील खवय्यांनाविशेषतः अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील लोकांना ज्या हापूसची गोडी लागली आहे, त्या अस्सल 'कोकण हापूस' आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे राहिले आहे.जगात सर्वांचा लाडका असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे ठाकले आहे. या आंब्यावर गुजरातने दावा करत भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी ‘वलसाड हापूस’ नावाने अर्ज केला आहे. ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये अर्ज केला आहे. कोकणातील आंबा बागायतदारांची त्यामुळे चिंता वाढली आहे.
कोकण हापूसचे पहिले आणि एकमेव मानांकन
जगात ‘कोकण हापूस’ हे हापूस आंब्याला मिळालेले पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. कोकणातील हापूस उत्पादकांना हे मानांकन एक सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षा मिळवून देते. 2018 मध्ये भौगोलिक मानांकन (GI Tag)कोकण हापूसला मिळाले. यापूर्वी 2022 मध्ये, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने देखील ‘हापूस आंबा’ नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला आहे. यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
गुजरातचा ‘वलसाड हापूस’वर दावा
2023 मध्ये ‘वलसाड हापूस’ नावाने गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने भौगोलिक मानांकन (Geographical Classification) मिळण्यासाठी अर्ज केला आहे. कागदपत्रे या संदर्भातील सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. 30 ऑक्टोबर रोजी या अर्जावर पहिली सुनावणी पार पडली आहे.
कोकण आंबा उत्पादकांचा विरोध
कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावाने 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला असून, त्यांच्याकडून कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने त्यानंतर 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्या बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली आहे. त्याला डॉ. विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध केला आहे.
आंबे उत्पादकांना आर्थिक फटका?
कोकण हापूसला 2018 मध्ये मानांकन मिळाले. या मानांकनामुळे कोकणातील हापूस उत्पादकांना सुरक्षित बाजारपेठेसह आर्थिक सुरक्षा मिळाली आहे. मुळात कोकण हापूसमध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील अन्य भागात उत्पादित होणाऱ्या आंब्याची भेसळ होते. अस्सल कोकण हापूससाठी 'क्यूआर कोड' तयार केला आहे. तरीही भेसळ होत आहे. आता वलसाड हापूसला मानांकन मिळाले तर कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होईल, त्यामुळे वसलाड हापूसला विरोध करीत आहोत, अशी माहिती डॉ. विवेक भिडे यांनी दिली.
भौगोलिक मानांकन म्हणजे काय?
मूळ ठिकाणाशी (भौगोलिक क्षेत्राशी) एखाद्या उत्पादनाला त्याच्या जोडलेले एक कायदेशीर संरक्षण आणि ओळखचिन्ह. हे दाखवते की ते उत्पादन त्या विशिष्ट भागातच तयार होते, त्याची गुणवत्ता, वैशिष्ट्ये किंवा प्रतिष्ठा त्या ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थिती, हवामान, माती, परंपरा किंवा स्थानिक कौशल्यामुळे येते. उदाहरणार्थ: दार्जिलिंग चहा (फक्त दार्जिलिंग भागातला चहा), कोल्हापुरी चप्पल, नाशिक द्राक्षे, हैद्राबादी हळेकुंद,बनारसी साडी, तिरुपती लडू, महाराष्ट्राचा हापूस आंबा! भौगोलिक मानांकन असलेली उत्पादने दुसऱ्या ठिकाणी पिकवली तरी त्याला त्या मूळ नावाचा वापर करुन विकता येत नाही.