एअरइंडियाचे ड्रीमलायनर विमान बोईंग 787 दिल्लीहून अहमदाबाद मार्गे लंडन ला जात असताना अचानक क्रॅश झाले.विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हे विमान क्रॅश झालं असल्याची माहिती आहे .यामध्ये सुमारे 272 प्रवासी प्रवास करत होते यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचाही ही समावेश असल्याची माहिती आहे. मात्र हा विमान अपघात घडला कसा ? त्यामागे काय कारण आहे हे विमानामध्ये असलेल्या ब्लॅक बॉक्स मधून च स्पष्ट होणार आहे.
प्रत्येक विमानामध्ये विमानामधील सर्व घडामोडींची, संवादांची सर्व माहिती रेकॉर्डिंग करण्यासाठी एका बॉक्स ची निर्मिती केलेली असते. त्याला च ब्लॅक बॉक्स असे म्हणतात. पहिले या बॉक्स चा रंग काळा असायचा त्यामुळे त्याच्यावरून त्याला ब्लॅक बॉक्स असे नाव पडले. मात्र आता तो बॉक्स नारंगी रंगाचा असतो.हा ब्लॅक बॉक्स प्रत्येक विमानामध्ये महत्वाची भूमिका बजावतो.
या बॉक्स मध्ये दोन भाग असतात. फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) असे हे दोन भाग असून यामध्ये विमानातील सगळा डेटा रेकॉर्ड केला जातो. तसेच कॉकपिटमधील संवाद ही या बॉक्स मध्ये रेकॉर्ड केले जातात. विमानाची उडताना असणारी उंची किती ? त्यावेळचे तापमान यासोबतच पायलट चे संवाद ही रेकॉर्ड केले जातात . यामुळे एखादे विमान जर अपघातग्रस्त झाले तर त्यामागची करणे या ब्लॅक बॉक्स मधील रेकॉर्डिंग मधून शोधता येऊ शकतात.
हा बॉक्स विमानाच्या अश्या जागी बसवलेला असतो जिथून एखाद्यावेळी जरी अपघात झाला तरी त्याचे नुकसान होऊ शकत नाही. आणि या बॉक्स वर पाणी आणि आग याचा काहीही परिणाम होत नसल्यामुळे वर्षानुवर्षे यामधील डेटा सुरक्षित राहतो. त्याचबरोबर या बॉक्स ची बॅटरी क्षमता ही जास्त असल्यामुळे यातील बॅटरी 30 दिवस टिकते. आज अहमदाबाद मध्ये एअरइंडियाचे विमान क्रॅश झाले त्याचे नेमके कारण काय ? त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाली होती ? या सगळ्याची उत्तरे या विमानाच्या ब्लॅक बॉक्स मधून आपल्याला समजणार आहे.