गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या आपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. हे विमान टेकऑफ केल्यानंतर 5 मिनिटांनी या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळलं.
या हॉस्टेलमध्ये वरच्या भागात कँटिन आहे. या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थी जेवणासाठी येतात.
समोर आलेल्या फोटोमध्ये विमानाचा मागचा भाग हॉस्टेलच्या इमारतीवर लटकलेलादेखील दिसत आहे
त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी मेडिकल कॉलेजच्या कँटिनमध्ये 50 ते 60 डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी जेवत असतात
या दुर्घटनेमध्ये काही डॉक्टर्स जागीच मृत्युमुखी पडले तर काही जखमी झाले आहेत