ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यावर केलेल्या 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांचे वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

भाजपचे आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यामध्ये मोठा वाद झाला असून महेश गायकवाड यांच्यावर गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या आरोप होत आहें

Published by : shweta walge

भाजपचे आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यामध्ये मोठा वाद झाला असून महेश गायकवाड यांच्यावर गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या आरोप होत आहें यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'मला याबाबत काहीही माहिती नाही तो वाद नेमका काय वाद आहे मी याबाबत काही बोलू शकत नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, पोलिसांनी संरक्षणासाठी आपल्याला पिस्तूल दिले आहे कुणाला मारण्याकरता पिस्तूल आपल्याला दिले नाही आमदारांनी कुठे मारलं काय मारलं ते मला माहित नाही जोपर्यंत मी घटनेची पूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत याबाबत वाच्यता करणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्या वादप्रकरणी दिली आहे.

विजय वडेट्टीवारांवर टीका करत गुलाबराव म्हणाले, कुठला मुख्यमंत्री गोळीबार करण्यासाठी कुणाला सांगत नाही स्वतः विजय वडट्टीवार सुद्धा सांगणार नाही. तो वाद नेमका काय आहे. ते पक्षाच काम करतो म्हूणन त्यांच्यात वाद असू शकत नाही असं नाही. नेमका याबाबत पोलीस तपास सुरू असून खरं काय ते समोर येईल त्यानंतर प्रतिक्रिया देऊ. पोलीस तपास समोर आल्यानंतर जर मुख्यमंत्री यांच्यावर टीका जर केली असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी जमले होते. भाजप आमदार गणपत गायकवाड त्यांचे कार्यकर्ते तसेच कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते.

आपापसातील वाद मिटवण्यासाठी हे पदाधिकारी जमले होते. या दरम्यान झालेल्या वादावादीतून ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे कल्याण परिसरात तणावाचे वतावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

OBC : मराठा आरक्षणाच्या जीआरवर ओबीसी समाजाचा संताप, नागपुरात महामोर्चाची घोषणा

Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच पडद्यामागील हालचालींना वेग

Nitesh Rane On Aaditya Tackeray : "आदित्य ठाकरे उद्या बुरख्यातून मॅच बघेल" वरळीत कोळीवाड्यात नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ; कोणत्या दिवशी कोणता रंग? जाणून घ्या ...