Raj Thackeray - Gulabrao Patil Team Lokshahi
ताज्या बातम्या

"भोंग्याच्या मुद्दयावर जनतेने राज ठाकरेंना ठेंगा दाखवला"

मंत्री गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित करुन राज्यात एक नवा वाद निर्माण केला आहे. त्यावरुन शिवसेनेचे (Shivsena) अनेक नेते सध्या मनसेवर (MNS) तुटून पडले आहेत. अशातच गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही आता राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी त्यांची भूमिका बदलत असतात. पक्ष स्थापनेपासून मराठीचा मुद्दा असो, की त्यांचा लाव रे तो व्हिडीओ आणि भोग्यांचा मुद्दा अशा पध्दतीने राज ठाकरे हे त्यांच्या नेहमी भूमिका बदलत असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.

राज्यात सध्या भोंग्यावरुन सुरु असलेल्या वादावर गुलाबराव पाटील म्हणाले की, राज ठाकरेंनी आता भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला मात्र, त्यांना या मुद्यावर राज ठाकरेंना काहीही हाती लागलं नाही. राज ठाकरेंना जनतेचा ठेंगा मिळाला असल्याचा टोला, यावेळी गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

जळगाव जिल्ह्यात कृषी विभागात केवळ 54 टक्के एवढेच मनुष्यबळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे रखडली असल्याची खंत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. इतर जिल्हृयात म्हणजेच नाशिकचे उदारहण घेतले तर नाशिकमध्ये 95 टक्के एवढा स्टाफ आहे. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असून विभागीय आयुक्तांकडे विनंती केली आहे. सरकार जरी आमच असलं तरी शेतकरी हा सुध्दा आमचाच आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याकडे बोट ठेवत तुमच्याकडे तुपाशी आणि आम्ही उपाशी असे कदापि सहन करणार नाही, असा इशारा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार