ताज्या बातम्या

'युतीत शून्य जागा जरी मिळाली तरी मान्य' - गुलाबराव पाटील

भाजपचं लोकसभा मिशन सुरु केले आहे. या मिशनमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भाजपचं लोकसभा मिशन सुरु केले आहे. या मिशनमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अवघे सोळा महिने शिल्लक राहिले आहे. भाजपची जय्यत तयारी सुरू असून लोकसभेत परत एकदा स्वबळावर सत्ता आणण्यासाठी एक वर्षापूर्वीपासून भाजपचे' मिशन 144' काम सुरु झाले. लोकसभा मतदारसंघ जिथे स्थानिक आघाडीमुळे भाजप आजवर निवडणूक लढली नाही अशा मतदारसंघांची निवड करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पक्षातीलच काही आपल्याबाबत षडयंत्र रचत असल्याचा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटात धुसफुस सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र मागच्या सरकारमध्ये धुसफुस नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अडीच वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्यात धुसफुस होती म्हणून तर गुवाहाटीला गेलो. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

तसेच 'भाजपाचे मिशन 144 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहेत. यात युतीचे नेत्यांनी जो निर्णय घेतला यात तो आम्हाला मान्य राहील. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे' युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा